Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तासगावमधील दुचाकी चोरट्याला अटक, ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली मिरजेसह कोल्हापूर जिल्ह्यातील १९ गुन्हे उघड, सांगली एलसीबीची कारवाई

तासगावमधील दुचाकी चोरट्याला अटक, ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली मिरजेसह कोल्हापूर जिल्ह्यातील १९ गुन्हे उघड, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या चिंचणी (ता. तासगाव) येथील तरूणाला अटक करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यातील १९ गुन्हे उघडकीस आणत ८.१० लाखांच्या १९ चोरीच्या दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.  

अमोल संभाजी साबळे (वय ४९, रा. चिंचणी, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाला सांगलीतील विश्रामबाग येथील जुना धामणी रस्ता परिसरात एकजण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली.  

पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. पथकाने तेथे संशयास्पदरित्या थांबलेल्या साबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती मिरजेतील एका रूग्णालयासमोरून ती चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक, विश्रामबाग, मिरज शहर, संजयनगर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुपुरी, गावभाग इचलकरंजी, शिवाजीनगर आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणखी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याने चोरलेल्या तब्बल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला मिरजेच्या महात्मा गांधी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक कुमार पाटील, बसवराज शिरगुप्पी, संदीप पाटील, अतुल माने, अरूण पाटील, सुशिल मस्के, विनायक सुतार, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.