गांधी चौकातील 'नाना'च्या नाना 'कळा' आता तरी थांबणार का?
सांगली : खरा पंचनामा
सांगलीच्या पूर्वेला असलेल्या ऐतिहासिक शहरातील ऐतिहासिक महात्मा गांधी चौकातील 'नाना'च्या नाना 'कळा' आता तरी थांबणार का? असा प्रश्न मिरजकरांकडून विचारला जात आहे. प्रभारी बदलल्यानंतर तरी नाना सुधारेल का अशी चर्चा आता खात्यात सुरू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नानाने गांधी चौक हलवून सोडला आहे.
अवैध व्यावसायिकांशी संबंध असल्याने या नानावर दुष्काळी भागात एकदा कारवाई झाली होती. त्यानंतर हा नाना गांधी चौकात स्थिरस्थावर झाला. चौकाला कळा लागल्यानंतर नानाच्या कळा सुरू झाल्या. त्याच्या कळांची चर्चा सांगलीपर्यंत पोहोचली आहे. नाना एक अवलिया असल्याचेही बोलले जाते. या नानाच्या आलिशान गाड्यांमधील रिल्सनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.
वरीष्ठ आणि प्रभारींपुढे साळसुदपणाचा आव आणणाऱ्या या नानाचे आता कलम होणार असल्याचीही चर्चा आहे. ऐतिहासिक नगरीतील लोकही त्याकडे डोळे लावून बसले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.