Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रालयात जाताय? आधी खिशात किती पैसे आहेत ते सांगा!

मंत्रालयात जाताय? आधी खिशात किती पैसे आहेत ते सांगा!



मुंबई : खरा पंचनामा 

मंत्रालयात येणाऱ्या व्हिजिटर्सची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. हे रोखण्यासाठी काटेकोर सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश करण्याआधी खिशात किती पैसे आहेत याची माहिती गेटवर द्यावी लागणार आहे.

मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी फेशिअल रेकग्निशन सिस्टम, प्लोअर मॅनेजमेंट, ट्रकिंग पर्सन, प्लॅप बॅरियर यासारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. हे कमी म्हणून की काय, आत मंत्रालयात येणाऱया व्यक्तीकडे किती पैसे आहेत हे संबंधिताचे खिशातील पाकीट काढायला लावून किंवा पर्समधील नोटांची मोजदाद मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर केली जाणार आहे. मंत्रालय सुरक्षेत असलेल्या पोलिसांकडून मर्यादित स्वरूपात त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे.

मंत्रालयात प्रवेश मिळाल्यावर तळमजल्यापासून अगदी सहाव्या मजल्यापर्यंत व्हिजिटर्सचा मुक्त संचार असतो. त्यामुळे मंत्रालयाच्या पायाभूत सुविधांवर परिणाम होतो. सुरक्षा यंत्रणेवरही ताण पडतो. यावर उपाय म्हणून मंत्रालय प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहेत. मात्र हे करत असताना एखाद्या अभ्यागताकडे असणाऱया पैशांचा हिशेब कशासाठी, अशी विचारणा होऊ लागली आहे.

मंत्र्यांना भेटायला येणाऱयांची तपासणी होणार का? मंत्रालयात येणाऱया सर्वसामान्यांची ज्या प्रकारे काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे तशीच तपासणी मंत्र्यांना भेटायला येणाऱया व्हिजिटर्सची होणार आहे का? त्यांच्याकडील रक्कम तसेच बॅगांची तपासणी करण्यात येणार आहे का, असा संतप्त सवाल केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.