शरद पवारांच्या शेजारी अजित पवार का नाही बसले? स्वतःच सांगितले कारण, म्हणाले 'आमच्यात चर्चा झाली...'
पुणे : खरा पंचनामा
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे सर्व दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर आली होती. विशेष म्हणजे शरद पवारांच्या शेजारीच अजित पवार बसणार होते. त्यांची नेमप्लेट देखील ठेवली होती. मात्र, नंतर ही आसन व्यवस्था बदलण्यात आली आणि शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले.
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी अजित पवारांना आसन व्यवस्थेमधील बदला विषयी विचारले असता ते म्हणाले, 'बाबासाहेब पाटलांना साहेबांशी (शरद पवार) बोलायचं होतं, म्हणून त्यांना मध्ये बसवलं. मलाही बोलता येत होतं. माझा आवाज असा आहे की दोन खुर्च्छा सोडून तिसऱ्याला ऐकायला जाईल.'
अजित पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यानंतर ते अध्यक्ष बोर्ड असलेल्या दालनात गेले. तेथे शरद पवारांच्यासोबत अजित पवार यांची अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पत्रकारांनी अजित पवारांना काय चर्चा झाली असे विचारले असता ते म्हणाले, या व्यवसायाच्या करता जे प्रश्न आहेत त्याचा सुतोवाच मी केला, त्यासंदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये सहकार, एक्साईज, कृषी, ऊर्जा होतं. सरकाराच्या या विभागांचा संबंध या व्यवसायाशी, इंडस्ट्रीसोबत येतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.