उद्धव ठाकरेंना जागा दाखवली अन् शरद पवारांना...
शिर्डी : खरा पंचनामा
भारतीय जनता पक्षाकडूनl आज शिर्डीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेकमंत्री उपस्थित होते.
या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह म्हणाले की, शरद पवार यांनी 1978 पासून दगाफटक्याचे राजकारण केले होते मात्र या विधानसभा निवडणुकीत तुम्ही त्या राजकारणाला 20 फुट जमिनीत गाडण्याचे काम केले. अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केली.
तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अमित शाह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत तुम्ही उद्धव ठाकरेंना त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत अस्थिरतेचे राजकारण सुरू होते मात्र आता स्थिर सरकार आले आहे. असं देखील अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण आणि लाडक्या शेतकऱ्यांमुळे आपला विजय झाला आहे. तसेच या निवडणुकीत हे सिद्ध झालं आहे की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि अजित पवारांची खरी एनसीपी आहे. असं देखील अमित शाह म्हणाले. तसेच 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली. याच बरोबर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जिंकणार आणि सरकार स्थापन करणार असा विश्वास देखील यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.