Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मद्यातून महसुलात वाढ करण्यासाठी सरकारनी स्थापन केली समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार

मद्यातून महसुलात वाढ करण्यासाठी सरकारनी स्थापन केली समिती
दोन महिन्यात अहवाल सादर करणार



मुंबई : खरा पंचनामा 

मद्यातून राज्याच्या महसुलातवाढ करण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती गठीत केली आहे. गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

इतर राज्यातील मद्य निर्मिती धोरण, परवाने, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास ही समिती करणार आहे. लाडकी बहीण योजना तसेच इतर योजनांमुळं राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर खडखडाट झाला आहे. यासाठी महसुलात वाढ करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत.

मद्यातून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी सरकारनं गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठीत केली आहे. इतर राज्यातील मद्य निर्मिती धोरणे, परवाने, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास ही समिती करणार आहे. त्यानंतर ही समिती दोन महिन्यात राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर मोठी टिका केली होती. राज्य सरकारने आता शासन निर्णय काढून समिती स्थापन केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्वाचा विभाग आहे. महसूल वाढविण्यासाठी विभागाने नवनवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले होते. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्यात यावा. मद्यार्क वाहतूक करणाऱ्या वाहनावर डिजिटल लॉक बसविण्याची कार्यवाही करावी. तसेच गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहे. सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांमुळं राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर खडखडाट झाला आहे. यासाठी महसुलात वाढ करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.