मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय, आता वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य
मुंबई : खरा पंचनामा
राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारची मंत्रिमंडळाची दुसरी बैठक आज मंगळवारी (ता. 07 जानेवारी) पार पडली. आता दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार, असा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
त्यानंतर आज ही दुसरी बैठरक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांपैकी पहिला निर्णय हा चारचाकी वाहनांसंदर्भात घेण्यात आला असून आता 01 एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल
मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी
तसेच, ई-कॅबिनेट सादरीकरण होणार, यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस होणार, आजच्या सादरीकरणानंतर ई-कॅबिनेट धोरणाची अंमलबजावणी होणार. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेटचे अधिकार, मंत्री परिषदचे अधिकार निश्चिती होणार. सोबतच विधानसभा कामकाज संदर्भात ही जबाबदारी निश्चित केली जाणार. विधान मंडळातील सादर करणाऱ्या विधेयकाची पद्धत ही निश्चित होणार. सोबतच प्रशासनातील अधिकाऱ्यांची अधिकार कर्तव्य निश्चित होणार.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.