"वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखता येत नसेल, तर नव्या अधिकाऱ्यांना आणु"
पुणे : खरा पंचनामा
'आम्ही पुण्यात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. त्यांना आवश्यक सर्व पायाभुत सोई-सुविधा देतो. तरी आयटीत काम करणाऱ्या तरुणीचा खुन, कोयता गँग, इथल्या गुन्हेगारी घटनांची महाराष्ट्राभर चर्चा होते. पोलिसांना मुभा देऊनही शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
याचा अर्थ वरिष्ठ पोलिस अधिकारीच कमी पडत आहेत, कायदा सुव्यवस्था राखणे त्यांच्या आवाक्याबाहेर असेल, तर त्यांनी सांगावे, नव्या अधिकाऱ्यांना आणुन गुन्हेगारीला चाप लावु' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.
विविध विकासकामे व प्रकल्पांबाबत पवार यांची गुरुवारी पुण्यात अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पवार म्हणाले, "पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रश्न मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गांभीर्याने घेतलेली आहे. मी या भागाचा प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे मीही त्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातले आहे.
पोलिसांच्या कामामध्ये पुण्यात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही. पोलिसांना इतकी मुभा असेल तसेच त्यांना मोठ्या प्रमाणात वाहने, घरे, पोलिस आयुक्त कार्यालये, पोलिस अधिक्षक कार्यालये अशा पायाभुत सोई-सुविधा दिल्या जातात. तरीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर मग वरिष्ठ पोलिस अधिकारीच कमी पडत आहेत. त्यांना जमत नसेल, तर त्यांनी स्पष्ट सांगावे, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. इतर चांगल्या अधिकाऱ्यांना आणुन गुन्हेगारीला चाप बसवु.'
पवार म्हणाले, 'आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा खुन, कोयता गँग, अन्य गँग यासंदर्भात महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही मी बोलणार आहे, 2-3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर सोमवारी पुन्हा पुण्याचा आढावा घेणार आहे. जनतेने आमचे सरकार आणण्याचे काम केल्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली आहे.
जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला तडा जाऊ नये, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. आमच्या अपेक्षा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सांगु, त्यांच्या अडचणी समजुन घेत पुढचे पाऊल उचलणार आहोत. पुणेकरांनी महायुती म्हणुन आम्हाला चांगली संधी दिली. त्यामुळे पुण्याच्या विकासावर भर देणार आहोत.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.