Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोडी करणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांना अटक ४.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

घरफोडी करणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांना अटक
४.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरातील विश्रामबाग आणि संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.  

सुदर्शन सुनिल यादव (वय १९, रा. भोसे, ता. मिरज), मुनीब मुश्ताक भाटकर (वय १९, रा. यशवंतनगर, सांगली), दीपक गंगाप्पा आवळे (वय २०, रा. १०० फुटी रस्ता परिसर, सांगली) अशी अटक केलल्यांची नावे आहेत. तर अक्षय उर्फ पिंट्या दोडमणी हा पसार झाला आहे. संजयनगर येथे झालेल्या घरफोडीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी एलसीबीचे तत्कालीन सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकातील संकेत कानडे यांना मिरजेतील मार्केट यार्ड येथे या चोरीतील संशयित येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.  

पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. तिघेही तेथे आल्यानंतर त्यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर यादव याच्याकडील पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड सापडली. तसेच भाटकर आणि आवळे यांच्या खिशातही रोकड सापडली. त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कर्नाळ रोड, भारत सूतगिरणी, विजयनगर चौक, विठ्ठलनगर येथील गांधी हायस्कूल येथे घरफोडी करून ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने, रोकड असा ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कराड, सांगलीतील विश्रामबाग, तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संकेत कानडे, अभिजित माळकर, अनंत कुडाळकर, गुंडोपंत दोरकर, अजय बेंदरे, रोहन गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.