Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होणार भाजप आमदाराच्या बँकेतून? मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत झाला निर्णय

आता शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होणार भाजप आमदाराच्या बँकेतून? 
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत झाला निर्णय



मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची नव्या वर्षातील पहिलीच बैठक झाली. आज (ता. २) 12 वाजता झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भाजपचे आमदार अध्यक्ष असणाऱ्या बँकेतून केले जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आज घेण्यात आलेल्या बैठकीत वादाचे कारण ठरलेल्या अभ्यंगत आणि इतरांना सहाव्या मजल्यावर प्रवेश द्यायचा की नाही यावर चर्चा झाली. पण मंत्री दत्तात्रय भरणेंनी बैठकीला दांडी मारण्याने राजकीय चर्चाना उत आला आहे. तर ते खात्यावरून नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये असंतोष पसरला असून मंत्री धनंजय मुंडेही या बैठकीला उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याने राजीनामा देण्याचा काहीच संबंध येत नाही, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले आहे. तर माझ्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठी घेतील असेही त्यांनी म्हटले आहे.

घेण्यात आलेले निर्णय :
१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)
२) शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होणार. यासाठी वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

शासकीय नोकरदारांचे वेतन मुंबै बँकेतून केले जाणार आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांची खाती मुंबै बँकेत उघडली जाणार आहेत. मुंबै बँक भाजपच्या ताब्यात असून भाजपचे आमदार प्रविण दरेकर याचे अध्यक्ष आहेत. तर दरेकर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.