Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीबीआयच्या बड्या अधिकाऱ्यावर CBIची कारवाई! 20 ठिकाणी छापेमारी

सीबीआयच्या बड्या अधिकाऱ्यावर CBIची कारवाई! 
20 ठिकाणी छापेमारी



मुंबई : खरा पंचनामा 

काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचा अधिकारी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. अशातच आता सीबीआयचाही एक अधिकारी लाच घेताना सापडल्याने खळबळ उडाली असून सीबीआयने पोलीस उपअधीक्षक ब्रिजमोहन मीनांच्या जागेवर छापा टाकत 55 लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,, लाचखोरी प्रकरणात सीबीआयने स्वतःचे पोलीस उपअधीक्षक ब्रिजमोहन मीना यांच्यासह काही जणांच्या घरावर छापेमारी केली. यामध्ये 55 लाख रुपये रोख रकमेसह सुमारे 1.8 कोटी रुपयांची गुंतवणूक दाखवणारी कागदपत्रे आणि लेजर नोंदी जप्त केल्या. यामध्ये एकूण रु. 1.6 कोटींचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. सीबीआयने मुंबईतील बँक सिक्युरिटीज आणि फसवणूक शाखेत (बीएसएफबी) तैनात असलेल्या ब्रिजमोहन मीना आणि इतर सात जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

मीना यांच्यावर एका खटल्यातील संशयित आणि साक्षीदारांना धमकावून 5 कोटींहून अधिक रुपयांची लाच गोळा केल्याचा आणि मध्यस्थांमार्फत लाचेची रक्कम जमा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात बुधवारी, सीबीआयने जयपूर, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये सुमारे 20 ठिकाणी शोध घेतला. मीना यांनी या प्रकरणातील संशयितांना धमकावून बँकिंग चॅनेल आणि हवाला नेटवर्कचा वापर करून मध्यस्थांमार्फत लाच घेतल्याचा आरोप आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मीना यांनी तपास केलेल्या प्रकरणांमध्ये विविध आरोपी आणि साक्षीदारांकडून लाच स्वीकारली होती आणि त्यांना चालू तपासातून वगळून किंवा तो तपास करत असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग कमी करून अवाजवी फायदा मिळवून दिला होता.

ही लाच रोख स्वरूपात किंवा मध्यस्थ किशन अग्रवाल यांच्या खात्यात बँक ट्रान्सफर करून स्वीकारली गेली. त्याचा वाटा घेतल्यानंतर उर्वरित रक्कम हवाला व्यवहारांद्वारे पुढे पाठवायचे. दरम्यान, या लाचखोरीच्या प्रकरणात अग्रवाल यांचे वडील हरीश आणि ब्रीजमोहन मीना नातेवाईक ऐश्वर्या यांच्यासह सर्वच व्यक्तींची भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी म्हणून नावे आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.