Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

SIT टीमवर दमानियांचा आक्षेप? पोलिस अधिकाऱ्याचा फोटो ट्वीट करत म्हणाल्या... कसे निष्पक्ष?

SIT टीमवर दमानियांचा आक्षेप? पोलिस अधिकाऱ्याचा फोटो ट्वीट करत म्हणाल्या... कसे निष्पक्ष?



बीड : खरा पंचनामा 



सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद अख्या राज्यभर उमटले आहेत. वाल्मिक कराडपाठोपाठ या हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या पोलिसांनी पुण्यात मुसक्या आवळल्या. पण आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी SIT टीमवरच आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर ट्विट करत SIT निष्पक्ष चौकशी करणार? असा सवाल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यानंतर राज्यभर संताप उसळला होता. तर या हत्याप्रकरणावरून विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट वाल्मिक कराडचा उल्लेख करत अटकेची मागणी केली होती.

यादरम्यान कराड पुण्यात सीआयडीला शरण आला. तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा साथिदार सुधीर सांगळे यालाही अटक करण्यात आली आहे. यानंतर अंजली दमानियांनी आरोपींच्या अटकेवरून देखील शनिवारी मोठा दावा करताना घुले हा दुसऱ्या क्रमांचा आरोपी असल्याचा दावा केला होता. तर सर्वात मोठा आरोपी कदाचित वाल्मिक कराडच असून ते आता समोर येत असल्याचे म्हटलं होतं.

राज्य सरकारने IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात दहा जणांची टीम नियुक्त केली आहे. ही टीक सध्या बीडमध्ये तपास करत आहे. अशावेळी दमानियांनी SIT वर आक्षेप घेत टीम निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे (बीड) पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा समावेश आहे.

याप्रकणात कराड याला आका म्हटले जात असून बीडमध्ये प्रस्थ आहे. अशाच वेळी SIT पथकातील महेश विघ्ने यांचा फोटो वाल्मिक कराड याच्या सोबत असणारा समोर आल्याने आता तपासावर सवाल उठत आहेत. तर या ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? बीडचे अधिकारी बीडच्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार? असा कडक सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. तर फोटो ट्विट करत बीड पोलिसांतील एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकरवर्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला आहे.

दरम्यान शनिवारी दमानिया यांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याच्या अटकेवरून भाष्य केले होते. वाल्मिक कराड यांना लोक सर्रास भेटायला जात असून राज्यात नेमकं काय सुरू आहे. पोलिसांचे किंवा सरकारचे अंकुश नाही. यामुळे कोण कोणाला भेटतो याच्या माहितीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावीत, अशीही मागणी अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणावरून केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.