कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर फेकले मिरचीचे पाणी
2 महिला अधिकारी, कर्मचारी जखमी
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
पो लिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अबरार निसार शेखच्या कुटुंबीयांनी कारवाईसाठी आलेल्या एनडीपीएस पथकावर हल्ला केला. घरातील तिखट पावडर पाण्यात मिसळून पथकावर फेकण्यात आली, ज्यामुळे तीन अधिकारी आणि कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या गोंधळाचा फायदा घेत अबरार निसार शेख पळून गेला. मात्र त्याच्या कुटुंबातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
परिस्थिती हाताळत पथकाने घरात प्रवेश करून तपासणी केली. त्यात २१० बटन गोळ्यांचा साठा आणि नायलॉन मांजाची चकरी जप्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मोहम्मद कैफ या संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून दोन स्ट्रिप बटन गोळ्या जप्त झाल्या होत्या. चौकशीत त्याने अबरार निसार शेखकडे मोठ्या प्रमाणात बटन गोळ्यांचा साठा असल्याची माहिती दिली.
हल्ल्यामुळे पोलिस निरीक्षक गीता बागवडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संजीवनी शिंदे आणि अंमलदार मारुती गोरे यांच्या डोळ्यांत तिखट पाणी गेले. त्यांनी पडदे आणि पाण्याचा आधार घेत डोळे साफ केले. त्याच वेळी अन्य पथकाने हल्लेखोरांना ताब्यात घेतले. सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.