Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आले"

"इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आले"



मुंबई : खरा पंचनामा 

सध्या बॉक्स ऑफिसवर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. देशभरातून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अनेक ठिकाणी सिनेमा हाऊसफुल असल्याचं पहायला मिळत आहे. कुणी वेश परिधान करून सिनेमा पाहण्यासाठी येतंय, तर अनेकांना सिनेमा पाहून झाल्यावर अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अशातच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो सिनेमा संपल्यावर शिवगर्जना करताना दिसतोय. स्वतः विकी कौशलने देखील हा व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

दाटलेल्या भावना, अश्रू भरल्या डोळ्यांच्या कडा आणि इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आलं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मी छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय, याचं मला अधिक समाधान वाटतंय, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर करत भावना व्यक्त केल्या.

या दाटलेल्या भावना, अश्रू भरल्या डोळ्यांच्या कडा आणि इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आले. छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय याचे समाधान वाटतेय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.