'संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांकडून माझ्या आणि कुटुंबाच्या जिवाला धोका'
राष्ट्रवादीच्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई : खरा पंचनामा
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. लवांडे यांनी दावा केला आहे की, संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
विकास लवांडे यांनी त्यांच्या 'सत्याग्रही' या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये त्यांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या व्हिडिओमुळे राज्यभरातून त्यांना धमकीचे फोन येत आहेत, असा दावा त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
ते म्हणाले, 'माझा मोबाईल नंबर आणि नाव व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर मला सतत फोन करून धमक्या दिल्या जात आहेत. मला 'पानसरे-दाभोलकर' करण्याची धमकी दिली जात आहे.'
लवांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, 'संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांकडून माझ्या आणि कुटुंबाच्या जिवाला धोका आहे,' असे स्पष्ट केले आहे.
विकास लवांडे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, 'संभाजी भिडे इस्लामिक दहशतवादासारखी हिंदू आतंकवादी मानसिकता तयार करत आहेत.' त्यावरून शिवप्रतिष्ठानच्या समर्थकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या प्रकरणावरून आता मोठी राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली आहे. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.