मिरजेत शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
महोत्सव समितीचे अध्यक्ष विलासराव देसाई यांची माहिती
मिरज : खरा पंचनामा
मिरजेत बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मान्यवरांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विलासराव देसाई यांनी दिली.
देसाई म्हणाले, मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीतर्फे गेल्या १५ वर्षांपासून शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री बारा वाजता मंगळवार पेठेतील शिवतीर्थावर सौ. सुमनताई सुरेश खाडे आणि राजमाता जिजाऊ महिला मंच यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येईल. बुधवारी सकाळी नऊ वाजता मिरजेतील किसान चौकात माजी मंत्री, आ. सुरेश खाडे, आ. इद्रिस नायकवडी, माजी महापौर किशोर जामदार, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, मनोज शिंदे-म्हैसाळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर, योगेंद्र थोरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता जवाहर चौक ते शिवतीर्थ या मार्गावर शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे उदघाटन खासदार विशाल पाटील, आ. सुरेश खाडे, आ. इद्रिस नायकवडी, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, युवा नेते जितेश कदम, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष संजय बजाज आदी मान्यवरांच्याहस्ते होणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष विलासराव देसाई, उपाध्यक्ष सचिन जाधव, मयूर निकम, सचिव दादासो पाटील, सहसचिव युनूस चाबूकस्वार, खजिनदार इरफान बारगीर यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.