२६/११ हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार
मुंबई : खरा पंचनामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला भारताकडे सोपविण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात, तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली.
या खटल्यातील त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. २००८ मध्ये भारतात झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणावर होता.
भारताने अमेरिकन एजन्सीसोबत तपशील शेअर केला होता, जो कनिष्ठ न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आला होता. भारताचा हा पुरावा न्यायालयाने स्वीकारला. भारताने दिलेल्या कागदपत्रात २६/११ हल्ल्यातील तहव्वुरची भूमिका नमूद करण्यात आली होती.
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वुर राणा हवा असल्याने भारत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. यापूर्वी, त्याला सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नॉर्दर्न सर्किटसह अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाईत हार मानावी लागली.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तहव्वुर राणा याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट केले होते. त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा यांचा सक्रिय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रात राणावर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचा आरोप होता. तहव्वुर राणा यानेच मुंबईत हल्ले होणार असलेल्या ठिकाणांची रेकी केली होती आणि ब्लूप्रिंट तयार करून ती पाकिस्तानी दहशतवाद्यांना दिली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.