भाजपच्या माजी नगरसेवकांनं पोलिस ठाण्यातच घेतलं विष
मुंबई : खरा पंचनामा
नवी मुंबईतील राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोरच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. भरत जाधव यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कर्जत पोलिस ठाण्यात हा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे.
भरत जाधव यांनी विषारी औषध पिल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. शरीरात विष पसरल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) सुरू करण्यात आली आहे.
भरत जाधव सध्या व्हेंटिलेटर असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. विषारी द्रव्य घेण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी व्यवसाय आणि राजकीय जीवनात काम करताना विरोधकांनी दिलेल्या त्रासबद्दल माहिती सांगितली आहे. काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये भरत जाधव यांनी आरोप करताना काही दलाल, राजकीय पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. भरत जाधव त्रास देणारे दलाल आणि राजकीय नेत्यांविरोधात तक्रारीसाठी कर्जत पोलिसांकडे गेले होते. तिथेच त्यांनी विष घेतले.
भरत जाधव यांचा मुलगा याने वडिलांना त्रास देणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात भरत जाधव यांच्या मुलाने तक्रार देण्याची तयारी केली आहे. भरत जाधव याने अशापद्धतीने विषारी द्रव्य घेतल्याने नवी मुंबईतील राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.