एमबीबीएसला ऍडमिशनच्या आमिषाने पोलिस निरीक्षकाला ५.३४ लाखांना गंडा
अमरावती : खरा पंचनामा
ऑनलाईन ठगबाजांनी अमरावती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस निरिक्षकाला त्याच्या मुलीला नीट कोचिंगसह एमबीबीएसला मॅनेजमेन्ट कोट्यातून अॅडमशीन मिळूवन देण्याचे आमिष देऊन चक्क ५ लाख ३४ हजार रूपयांनी फसवणूक केली आहे. याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांनी मुंबईतील तीन ठगबाजांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
दिपक खांडु कडव, गणेश नारायण, ओम मुनी गिरी गणुसाई (सर्व रा. रामनगर सोसायटीनंबर ५, एक्ससर रोड, डोंगरी, गोविंदनगर, बोरीवली वेस्ट, मुंबई) अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर, फसवणूक झालेल्या तक्रारकर्त्या पोलिस निरिक्षकांचे नाव संतोष शामसिंग डाबेराव (५०) असे आहे.
माहितीनुसार, निरीक्षक संतोष डाबेराव हेअमरावती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असून सध्या त्यांची पोस्टींग एसपी ऑफीसमधील नियंत्रण कक्षात आहे. संतोष डाबेराव हे ऑक्सीजन पार्क समोरील पोलिस आशियाना वसाहतीमध्ये पत्नी व १८ वर्षीय मुलीसोबत राहतात. संतोष डाबेराव यांची मुलगी १२ वीची परिक्षा उर्तीण झाली असून ती सध्या नीटच्या परिक्षेची तयारी करित आहे. मुलीने ऑनलाईन स्टटीजव कोचिंग सेंटर सर्च करतांना वडील संतोष यांचा मोबाइल क्रमांक मेन्शन केला आहे. त्यानुसार ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी संतोष डाबेराव यांच्या मोबाइलवर आधी ९९८९१५२६४३ या क्रमांकाहून समवेदना सन्व्हसेसच्या नावाने फोन आला. समोरच्या व्यक्तीने संतोष यांना दिपक खांडु कडव असा परिचय देऊन मुलीला नीटचे कोचिंग देऊन हैद्राबाद येथील एलटीएमटी मेडीकल कॉलेजमध्ये मॅनेजमेन्ट - कोट्यातून अॅडमीशन देण्याचे आमिष दिले. संतोष डाबेराव यांनी स्वतः पोलिस निरिक्षक असल्याचा परिचय देत दिपक कडूवची फोनवर नीट कोचिंग व एमबीबीएसच्या अॅडमशीनाबाबत चौकशी केली. संतोष डाबेराव हे मुलीच्या अॅडमशीनसाठी थोडेफार इच्छुक दिसल्याने त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर ९०००११४६५१, ९९६३६०७०२४, ९९०८ १२६६०० या क्रमांकावरून सतत फोन आले. संतोष डाबेराव मुलीच्या अॅडमीशनसाठी तयार झाल्याने आरोपींनी त्यांना दरवर्षी २४ लाख रूपये खर्च येईल असे सांगितले आणि तीन महिन्यात प्रोसेसींग व रजिस्ट्रेशनच्या नावाने त्यांच्याकडून ऑनलाईनने ५ लाख ३४ हजार रूपये उकळले आणि तेवढयाच रकमेचा डीडी घेऊन हैद्राबादला येण्याचे सांगितले. परंतु, अचानक चारही क्रमांक नॉटरिचेबल झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळताच पीआय संतोष डाबेराव यांनी याबाबत फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी वरील नमूद आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून पोलिस पुढील तपास करित आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.