सांगलीत संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत बुधवारी चर्मकार
समाजाचे दैवत, संत रोहिदास महाराजांची जयंती रोहिदास नगर येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करीत सांगलीत शोभा यात्रा काढण्यात आली. संत रोहिदास विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि रत्नदीप व्यायाम मंडळाकडून या सोहळ्याचे आयोजन केले होते. या निमित्त श्री रोहिदास विठ्ठल मंदिर गावभाग येथे पुढील दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन संत रोहिदास जयंती महोत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.
आज सकाळी समाजाचे कार्यकर्ते प्रदीप कांबळे, कुणाल संकपाळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू भोसले, दीपक चव्हाण, रवींद्र वादवणे, उदय मुळे, माधुरी वसगडेकर, डॉ. सुधीर गवळी, माजी नगरसेविका शलाका पवार यांच्या उपस्थितीत संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.