मध्यधुंद तरुण तरुणीचा धिंगाणा; पोलीस निरीक्षकाला बदलीची शिक्षा
गंगापूर : खरा पंचनामा
मध्यरात्री रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तरुण- तरुणीच्या टोळक्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सात ते आठ जणांविरोधात गंगापूर रॉड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोडचे पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांनी कारवाई करण्यात विलंब केल्याने त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
रविवारी काही तरुण आणि तरुणी गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ एक क्लबमधून नाईट पार्टी करून मध्याच्या नशेत धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्ती पथक दाखल झाले होते. यावेळी एका तरुणाने तसेच एका तरुणीने पोलिसांशी अरेरावी केली. या तरुणीचा सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल झाला आहे.
पोलिसांकडून अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नव्हती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर अशोक साळवे (30, रा. पवननगर, सिडको), वैशाली वाघमारे (नाशिकरोड) भूमी ठाकूर (19, रा. भाभानगर), आल्तमश शेख (वडाळागाव), दोन बाऊन्सर यांच्याविरुद्ध तसेच हॉटेलचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे. जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली होती, मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.