Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्या केलेले शिक्षक सेक्सटॉर्शनचे बळी

अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्या केलेले शिक्षक सेक्सटॉर्शनचे बळी



मुंबई : खरा पंचनामा 

सेक्सटोर्शनच्या विळख्यात अडकलेल्या ५० वर्षीय शिक्षकाने अटल सेतू पुलावरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. शिक्षकांचा मृतदेह अद्याप मिळून आलेला नसून स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. वैभव पिंगळे असे या दुर्देवी शिक्षकाचे नाव आहे. वैभव पिंगळे हे पनवेल तालुक्यातील कुर्डस गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. ते सेक्सटॉर्शनचे बळी त असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पिंगळे यांच्या कुटुंबात त्यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते याची पूर्वकल्पना होती. पिंगळे यांचे दूरचे नातेवाईकही पोलिस विभागात होते ज्यांनी त्यांना काळजी करू नका आणि औपचारिक पोलिस तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. समाजात बदनामी होईल या भीतीने त्यांनी गुन्हा नोंदवू दिला नाही. रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते, मात्र तक्रार न करताच निघून गेले होते असे उलवे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता वैभव पिंगळे हे बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. त्यांनी मोबाईल फोन घरीच सोडून ते चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले होते आणि जवळजवळ ९ किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी त्याची गाडी पुलावर उभी करून गाडीच्या बाहेर पडले आणि त्यांनी पुलावरून उडी मारली, असे उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी माहिती दिली.

पिंगळेच्या कुटुंबाने उलवे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वैभव पिंगळे हे ऑनलाईन सेक्सटोर्शन रॅकेटच्या जाळ्यात अडकले होते. त्यांना सतत कॉल करून ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्यांनी सायबर माफियांना एकदा १२ हजार दुसऱ्यांदा ६ हजार रुपये ऑनलाईन पाठवले होते. होते. त्यानंतर त्यांनी सर्व नंबर ब्लॉक केले होते पण तरीही त्याला वेगवेगळ्या नंबरवरून खंडणीची रक्कम मागणारे कॉल येत राहिले. सायबर माफियांकडे पिंगळेच्या संपर्क यादीची माहिती होती आणि तो वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेण्यासाठी त्याला ब्लॅकमेल करत होते असे गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पिंगळे यांनी एक नवीन फोन खरेदी केला होता जो कारमध्ये सीलबंद बॉक्समध्ये सापडला आहे. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.