"जयंत पाटलांना भाजप प्रवेशावरून बदनाम केलं जातय"
कोल्हापूर : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. सातत्याने सत्ताधारी नेत्यांकडून याबाबत संकेत देण्याचे काम सुरू आहे. मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच आता हा विषय संपवला आहे.
भाजप प्रवेशाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. ते भाजपमध्ये येणार अशी अफवा पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले. ते कोल्हापुरात बोलत होते.
जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार नाहीत. त्यांच्याशी आमचा कोणताही संपर्क नाही, असेही चंद्रशेखर वावनकुळे म्हणाले. राज्यात गेल्या महिनाभरापासून मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेते आमदार सुरेश धस यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर दोघांनीही एकमेकांची भेट घेतली.
त्यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना आजारी असल्याने भेटले. त्यांचा कोणताही दुसरा हेतू नाही. धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. एकादा विषय हातात घेतला तर ते धसास लावतात. धस आणि मुंडे या दोघांनीही सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महायुती मधील सर्वच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात कामाला लागले आहेत. रखडलेले दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर लवकरच निर्णय घेतला जाईल. तो विषय अंतिम टप्प्यात आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही. या योजनेतून आर्थिकदृष्या सक्षम असणान्या महिलानी स्वत-हून बाजूला व्हावे, असे आवाहन केले आहे. योजनेतून बाहेर जाणायांवर कोणावरही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.