मिरजेत गांजा विक्री करणाऱ्याला अटक
दोन किलो गांजा जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेत सोलापूर एक्सप्रेस वेवरील उड्डाण पुलाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2.3 किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
धनंजय बळवंत भोसले (वय 33, रा. साई मंदीर पाठीमागे, एमआयडीसी रोड, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार सुरज नागनाथ सरवदे (रा. रविवार पेठ, जोशी गल्ली, आर. के. कोल्ड्रींक जवळ, सोलापुर) पसार झाला आहे. भारत सरकारच्या "नशामुक्त भारत अभियान"च्या पार्श्वभूमीवर सहायक निरीक्षक शिंदे यांनी अमली पदार्थ विक्री, साठा, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या आहेत.
पथक सोलापूर एक्सप्रेस वे परिसरात गस्त घालत असताना अंकलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका उड्डाण पुलाखाली एकजण गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून भोसले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ दोन किलो गांजा सापडला. तो जप्त करून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने तो गांजा सोलापूर येथील सरवदे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, राजेंद्र कलगुटकर, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सूरज पाटील, राहूल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक सहा. उपनिरीक्षक सुनिल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.