Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन हजारांची लाच मागणाऱ्या राजापूरच्या महिला तलाठ्याविरोधात गुन्हा मंडल अधिकाऱ्याच्या नावाने मागितली लाच : सांगली 'एसीबी'ची कारवाई

दोन हजारांची लाच मागणाऱ्या राजापूरच्या महिला तलाठ्याविरोधात गुन्हा 
मंडल अधिकाऱ्याच्या नावाने मागितली लाच : सांगली 'एसीबी'ची कारवाई 



सांगली : खरा पंचनामा 

जमिनीची नोंद घालण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांच्या नावावर व स्वतःसाठी 2 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या राजापूरच्या महिला तलाठ्याविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

सुजाता आण्णाप्पा जाधव (रा. वारणाली, गल्ली नं. 05, वारणा प्रेस्टीज अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 04, सांगली) असे त्या महिला तलाठ्याचे (ग्राम महसूल सहायक) नाव आहे. राजापूर येथील एकाने जमीन खरेदी केली होती. त्याची नोंद सातबारावरती करण्यासाठी त्यांनी तलाठी सुजाता जाधव यांच्याकडे अर्ज केला होता. ही नोंद सातबारावर करण्यासाठी तलाठी जाधव यांनी तासगाव तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या बाहेर सुरुवातीला मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने 3 हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्यानंतर याप्रकरणी संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. 11 फेब्रुवारी रोजी या लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी तलाठी जाधव यांनी तासगाव तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तलाठी सुजाता जाधव यांच्या विरोधात लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापूरच्या तलाठी सुजाता जाधव यांनी मंडल अधिकाऱ्यांच्या नावाखाली लाच मागितली होती. याप्रकरणी 'त्या' सर्कलचीही आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक पाटील यांनी सांगितले. 

सांगली एसीबीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक विनायक भिलारे, सीमा माने, अजित पाटील, प्रीतम चौगुले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.