Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निलंबित पोलीस निरीक्षकाची हिंदु धर्म सोडण्याची घोषणा

निलंबित पोलीस निरीक्षकाची हिंदु धर्म सोडण्याची घोषणा



झाशी (उत्तरप्रदेश) : खरा पंचनामा 

येथील पोलीस निरीक्षक मोहित यादव यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर निलंबित करण्यात आले. यावरून यादव यांनी त्यांच्यावर जातीयतेतून अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी येथील एलिट चौकात घरातील देवतांची सर्व चित्रे, तसेच मूर्ती, पूजेचे साहित्य आणून ठेवत हिंदु धर्माचा त्याग करत असल्याचे घोषित केले.

मोहित यादव यांनी सांगितले की, मी असा धर्म सोडला आहे ज्यामध्ये जातीयता आहे. जातीच्या नावाखाली दुसऱ्या व्यक्तीचे जीवन हे जीवन मानले जात नाही. जातीच्या नावाखाली देवतांचे आशीर्वाद मिळतात, या प्रकारचा धर्म सोडून देण्यात आला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून माझे शोषण होत आहे. माझ्यावर खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला आहे. मला निलंबित करण्यात आले आहे. या सर्व गोष्टी फक्त जातीच्या नावाखाली घडत आहेत. एका विशिष्ट जातीचे लोक वरच्या स्थानी बसले आहेत. माझ्या दृष्टीने ते तारका आणि पुतना (राक्षस) आहेत.

१० दिवसांपूर्वी मोहित यादव यांनी एलिट चौकात चहाचा टपरी लावून चहा विकून निषेध नोंदवला होता. निलंबित झाल्यानंतर यादव यांच्यावरील आरोपांची चौकशी चालू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.