'व्हॅलेंटाईन डे'ला बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत दिली १०० पिझ्झाची ऑर्डर
प्रेयसीने घेतला ब्रेकअपचा बदला
गुरुग्राम : खरा पंचनामा
गुरुग्राममधील एका २४ वर्षीय तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या एक्स बॉयफ्रेंडला चांगलाच धडा शिकवला. प्रेससीने शिकवलेला धडा हा तरुण कधीही विसरू शकणार नाही. दोघांचेही काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. या ब्रेकचा बदला तरुणीने घेण्यासाठी प्लॅन रचला. या साठी तरुणीने तरुणीने व्हॅलेंटाईन डे चा दिवस निवडला.
प्रेसिने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून बॉयफ्रेंडच्या घरच्या पत्त्यावर एकाच वेळी १०० पिझ्झा मागवले, तेही कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायाने. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी पिझ्झा आले तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड हादरला.
पिझ्झा डिलिव्हरी बॉयने ऑर्डर डिलिव्हरी करून पैसे मागितले तेव्हा त्याची परिस्थिती बिकट झाली. एक्सने या ऑर्डरची काहीच माहिती नसल्याचा दावा केला, ज्यामुळे त्याच्यात आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद झाला. १०० पिझ्झा पाहून परिसरातील लोकही त्याच्या घराजवळ जमा झाले. यामुळे ही घटना परिसरात मोठ्या चर्चेची ठरली. एवढेच नाही तर ही बातमी सोशल मीडियावर देखील व्हायरल झगली. यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मीडियावरही ही बातमी पसरली. काही लोकांनी ही घटना गमतीशीर मानली आणि हसण्याच्या इमोजीसह कमेंट केल्या, तर काहींनी प्रेयसीची ही कृती बालिश आणि चुकीची असल्याचे म्हटले. ब्रेकअपनंतर एखाद्याला त्रास देणे योग्य नाही, असे अनेकांनी लिहिले आहे. तर काही लोकांनी या घटनेचं वर्णन फिल्मी सीन असं केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.