न्यू इंडिया बँकेचा माजी महाव्यवस्थापक मेहता अटकेत
मुंबई : खरा पंचनामा
न्यू इंडिया बँकेत १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. मेहता याच्याकडे बँकेचे महाव्यवस्थापक आणि अकाउंट विभागाचे प्रमुखपद होते.
त्याचा गैरवापर करून अन्य साथीदारांसह कट आखला आणि बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयांतील तिजोरीत ठेवलेल्या १२२ कोटी रुपयांचा अपहार केला, असा आरोप आर्थिक गुन्हे शाखेने ठेवला आहे. मेहता ९०च्या दशकात या बँकेत कारकून म्हणून रुजू झाला होता. पदोन्नती मिळवून तो महाव्यवस्थापकपदापर्यंत पोहोचला होता.
बँकेतील आर्थिक अनियमितेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मेहता आणि त्याच्या साथीदारांविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आज सकाळी मेहता याला ताब्यात घेण्यात आले.
दिवसभर चौकशी केल्यानंतर सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, दहिसर येथील निवासस्थानाहून तपासाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. आर्थिक अनियमिततेमुळे न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.