सांगलीत बुधवारी सेवा गौरव, आदर्श माता, आदर्श विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण
शिवजन्मोत्सवानिमित्त शिवतेज सेवाभावी संस्था, राजलक्ष्मी महिला फौंडेशनचा उपक्रम
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मान्यवरांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवतेज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, राजलक्ष्मी महिला फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ सेवा गौरव पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कारांचे मान्यवरांच्याहस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाले, शिवतेज संस्था आणि राजलक्ष्मी फाऊंडेशनतर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विश्रामबाग येथील गव्हर्नमेंट कॅलनी येथे बुधवारी दि. १९ रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी के. के. बिल्डर्सचे चेअरमन के. के. शहा यांच्या अध्यक्षतेखाली डॅ. वैभव माने आणि महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते ज्येष्ठ सेवा गौरव पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक युवराज गायकवाड, श्रीपती पाटील, एस. आर. पाटील, आनंदराव गडदे, एस. एस. शेळके, महादेव पवार, शिवाजी पवार, सुरेश वसगडे, सुभाष तोडकर, सुरेश कुलकर्णी, आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.