Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन महिला कॉन्स्टेबलचा छळ करणारा आयपीएस अधिकारी निलंबित

दोन महिला कॉन्स्टेबलचा छळ करणारा आयपीएस अधिकारी निलंबित 



चेन्नई : खरा पंचनामा 

दोन महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सिनीयर आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. संबंधित आयपीएस अधिकारी मागील काही दिवसांपासून दोन महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक छळ करत होता. आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. या प्रकरणी पीडित पोलीस कॉन्स्टेबल्सने तक्रार दाखल केल्यानंतर छळ करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.

डी महेश कुमार असं निलंबित केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते तामिळनाडूचे सहआयुक्त असून त्यांच्याकडे उत्तर चेन्नईच्या वाहतूक विभागाचा पदभार होता. याच विभागात काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्याकडे डी महेश कुमार शरीरसुखाची मागणी करत होते. याला विरोध केला असता, ते वारंवार अश्लील चॅट आणि व्हिडीओ कॉल करून महिला त्रास देत होते. अखेर दोन्ही महिलांनी डी महेश कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

पोलीस कॉन्स्टेबलकडून लैंगिक छळाच्या अनेक तक्रारींना तोंड देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आता तामिळनाडू पोलीस विभागाने डीजीपी सीमा अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समितीची स्थापना केली होती. तपासानंतर आता महेश कुमार यांना आता निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांच्या मते, महेश कुमार यांच्याविरुद्ध दोन महिला कॉन्स्टेबलनी डीजीपी शंकर जिवाल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर हे प्रकरण आयसीसी अर्थात इंटर्नल कंम्प्लेंट कमिटीकडे पाठवण्यात आलं. पीडित महिलांनी तक्रारीसोबत डी महेश कुमार यांनी केलेल्या अश्लील चॅटचे स्क्रीनशॉट्स पुरावे म्हणून सादर केले होते. आयसीसीच्या प्राथमिक चौकशीनंतर, महेश कुमार यांना आता गृह विभागाने निलंबित केले आहे. डी महेश कुमार हे डिसेंबर २०२४ पर्यंत वाहतूक विभागात चेन्नई दक्षिणचे सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली चेन्नई उत्तरमध्ये करण्यात आली होती. एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने अशाप्रकारे हाताखाली काम करणाऱ्या महिला सहकाऱ्यांचा अशाप्रकारे छळ केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.