फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा होता कट?
महायुती सरकारकडून तपासाकरिता SIT स्थापन
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या वर्षी निवडणुकांचे वारे होते. दोन महत्त्वाच्या निवडणुका यावेळी पार पडल्या. त्यातून 4 जून रोजी लोकसभा तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हे जाहीर झाले.
या दोन्ही निकालानतर पुन्हा एकदा देशात पतप्रधान नरेंद्र मांदा विराजमान झाले आणि राज्यातही दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. यावेळी फडवणीसांनी अनेक महत्त्वाचे निर्णय, बदल करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आता महायुती सरकारने एसआयटी स्थापन केल्याचे वृत्त आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ही एसआयटी स्थापन करण्यामागे कारण असे की, मविआच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचा कट होता का, याचा तपास याद्वारे घेतला जाणार आहे.
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. फडणवीस यांना अडकविण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याबाबत एक पोलीस उपायुक्त सामान्य नागरिकावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओत दिसत असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला होता.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी डिसेंबर महिन्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. आता या मागणीच्या आधारावर महायुती सरकारने सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करेल.
महायुती सरकारने यासंबंधी शासन निर्णय 31 जानेवारी रोजी काढला आहे. या विशेष तपास पथकात राजीव जैन (पोलीस उपमहानिरीक्षक, एसआरपीएफ, मुंबई), नवनाथ ढवळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6 मुंबई) आणि आदिकराव पोळ (सहायक पोलीस आयुक्त मुंबई शहर) या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास पथकाला अहवाल सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.