Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा :  पालकमंत्री चंद्रकांत पाटील 



सांगली : खरा पंचनामा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना संबंधी आढावा बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. केलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

 या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय प्रमुख यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यान्वयीन यंत्रणांना निधी वितरण, वितरित निधीचा यंत्रणानिहाय खर्च आदिंचा तपशीलवार आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उर्वरित अल्प कालावधीत यंत्रणांनी आपल्याकडील 100 टक्के निधी खर्च करावा. जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी. विहित मुदतीत निधी खर्च करून राज्यात उत्तम स्थान पटकवावे, असे त्यांनी निर्देशित केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी रस्त्यांची कामे, साकव यासारखी कामे दर्जेदार करावीत. काम सुरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग करावे, असे सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.