Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चलनातून 101 कोटी रुपये बाद, आरबीआयच्या नकारामुळे बँकांची चिंता वाढली

चलनातून 101 कोटी रुपये बाद, आरबीआयच्या नकारामुळे बँकांची चिंता वाढली

मुंबई : खरा पंचनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये नोटबंदीची घोषणा केली. या घोषणेनंतर जिल्हा सहकारी बँकांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र बँकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) जमा केलेल्या नोटा जमा करण्यास उशीर केला.

यानंतर अनियमित व्यवहार आणि काळ्या पैशाच्या शक्यतेमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आता बँकांना चलनातून बंद झालेल्या तब्बल 101.2 कोटी रुपयांच्या नोटा सुरक्षित ठेवण्यात अडचणी येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सर्वाधिक रक्कम आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.