"धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं"
मुंबई : खरा पंचनामा
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे.
"आवादा कंपनीने मे महिन्यापासून तक्रार केली होती. जर त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती. पीआय महाजन, बनसोडे संपूर्ण कटात सामील होते. त्यांना अनेक गोष्टी माहिती होत्या," असा दावा दमानिया यांनी केला.
"पीआय महाजन यांना सहआरोपी करा. त्यांचे चार्ज शिटमध्ये नाव नाही. तसेच 10 पोलीस अधिकाऱ्यांची यादी आहे. त्यांना देखील सहआरोपी करायला पाहिजे. कारण त्यांनी आरोपींची मदत केली आहे," असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला.
"आरोपी सुदर्शन घुले याचे स्टेटमेंट देखील अर्धवट आहे. गुन्हा कसा झाला? हत्या करून ते कुठे गेले? भिवंडीत आणि पुण्यात कसे आले? या सगळ्यांना धनंजय मुंडे कॉर्डिनेट करत होते," असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.
पुढे त्या म्हणाल्या की, "सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप चॅटवर असून यांना सहआरोपी केले तर पुरावे समोर येतील. त्यांना वाचविले जात आहे. तिघांचा जबाब सारखाच आहे," असेही दमानिया यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.