'तुला कापून ड्रममध्ये भरेन'
पत्नीची पतीला धमकी
झाशी : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सौरभ हत्याकांडाची सध्या देशभरात तर्चा सुरु आहे. त्यातच आता तेथील एक प्रकरण समोर आलं आहे जिथे पत्नीने भांडणानंतर पतीला अशाच प्रकारे भयानक हत्या करण्याची धमकी दिली. महिलेने भांडणादरम्यान पतीला म्हटलं की, मेरठ हत्याकांडप्रमाणे तुलाही कापून ड्रममध्ये भरेन. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी आम्हाला दोन्ही बाजूंनी तक्रार मिळाली असून, तपासानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. झांशी येथील निवासी आणि गोंडा जल निगममध्ये काम करणारा ज्युनिअर इंजिनिअर (जेई) धर्मेंद्र कुशवाहाने आपली पत्नी माया मौर्य आणि तिचा प्रियकर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला आहे.
कुशवाहने सांगितलं की, त्याने 2016 मध्ये त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या माया मौर्यशी प्रेमविवाह केला होता. मुलीच्या जन्मानंतर पत्नीच्या नावे मी 3,4 चारचाकी गाड्या घेतल्या. आजही मी त्याचे हफ्ते भरत आहे.
कुशवाह म्हणाला की, त्याने 2022 मध्ये मायाच्या नावावर जमीन खरेदी केली आणि घर बांधण्याचं कंत्राट तिचे नातेवाईक नीरज मौर्यला दिलं. या काळात, मायाने तिच्या नातेवाईकाशी जवळीक साधली आणि कोविडमध्ये काळात नीरजच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांचे नाते अधिक घट्ट झाले.
कुशवाह यांनी दावा केला आहे की, त्यांनी 7 जुलै 2024 रोजी माया आणि नीरज यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. मी विरोध केला असता मला मारहाण करण्यात आली आणि माया घर सोडून गेली. माया नंतर 25 ऑगस्ट 2024 रोजी नीरजसोबत घरात परतली आणि जबरदस्तीने कुलूप तोडून आत शिरली. ती 15 ग्रॅमची सोन्याची साखळी आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. याशिवाय, महिलेने तिच्या पतीला वायपरने मारहाण केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
कुशवाहने 1 सप्टेंबर 2024 रोजी या संदर्भात तक्रार दाखल केली. 29 मार्च 2025 रोजी मायाने त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिने विरोध केला तेव्हा तिने तिचा प्रियकर नीरजसह आई आणि मुलगा दोघांनाही मारहाण केली. कुशवाहने दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, यावेळी माया म्हणाली की, जर तू जास्त बोललास तर मी तुला कापून टाकीन आणि मेरठ हत्याकांडाप्रमाणेच ड्रममध्ये भरून टाकीन.
दरम्यान, मायाने दावा केला की तिचा पती खोटे आरोप करत आहे. तिने सांगितले की कुशवाहा तिला त्रास देत होता आणि चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडलं. तिच्या तक्रारीत मायाने म्हटलं आहे की, जुलै 2024 मध्ये कुशवाहाने तिच्यावर हल्ला केला, त्यानंतर तिने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर कुशवाहाने घटस्फोटाचा खटला दाखल केला आणि तिला घराबाहेर हाकलून लावले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.