मीच इंद्रजित सावंत यांना कॉल केला होता
प्रशांत कोरटकरची कबुली
कोल्हापूर : खरा पंचनामा
छत्रपती शिवाजी महाराज व इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना पोलिसांनी तेलंगणा येथे पकडून अटक केली. त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याने पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यान इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता, असे सांगितले आहे. प्रशांत कोरटकर हा तब्बल महिनाभर फरार होता. या काळात त्याने एक व्हिडीओ बनवून शेयर केला होता. ज्यात त्याने आपण इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप फेटाळला होता. मात्र, आता त्याने इंद्रजीत सावंत यांना फोन केल्याची कबुली दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानकारक टिप्पणी केल्याचाही आरोप खरा ठरण्याची शक्यता आहे.
तसेच त्याच्या मोबाईलमधील डाटादेखील डिलीट केल्याचं कोरटकरकडून मान्य करण्यात आले आहे. पोलिसांनी मध्यरात्री ५ तास कोरटकरची चौकशी केली. त्या चौकशीत त्याने ही कबुली दिल्याचे बोलले जात आहे. अटक टाळण्यासाठी आपण हैदराबादमार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो, असेही कोरटकर याने पोलिसांना सांगितले. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी कोरटकरच्या कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे पोलिसांकडून आज पुन्हा एकदा त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर उद्या त्याला कोर्टात हजर केले जाईल. तोपर्यंत पोलिसांच्या हाती आणखी कोणकोणती माहिती लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने बुधवारी प्रशांत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घेतले. जवळपास तीन-चार तास ही प्रक्रिया सुरु होती. त्याचा अहवाल पुढील चार-पाच दिवसांत येण्याची शक्यता आहे. इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील संभाषणाचे विश्लेषण फॉरेन्सिक टीमकडून केले जाईल. त्यासाठी इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचेही नमुने पोलिसांकडून घेण्यात आले आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना मीच पोहणे केल्याचे काबुल केले आहे, त्यामुळे उद्या होणाऱ्या कोर्ट सुनावणीत काय होईल हे पाहणे महतत्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.