गृहमंत्री अमित शहांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव
नवी दिल्ली : खरा पंचनामा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद जयराम रमेश यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दाखल केली आहे.
काँग्रेसची सत्ता असताना पंतप्रधान मदत निधीची स्थापना करण्यात आली आणि नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात पीएम केअर्सची स्थापना करण्यात आली. "काँग्रेसच्या सत्ताकाळात केवळ एका कुटुंबाचेच त्यावर नियंत्रण होते आणि काँग्रेस अध्यक्ष सरकारच्या या मदतनिधीच्या भाग होत्या," असे विधान राज्यसभेत २५ मार्च रोजी आपत्ती निवारण विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी केले होते.
अमित शहा यांनी नाव न घेता सोनिया गांधींकडे इशारा करीत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत जयराम रमेश यांनी आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्याकडे हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दाखल केली. सोनिया गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा अमित शहा यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आरोप रमेश यांनी या नोटीशीमध्ये केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.