Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशमुखांच्या छातीवर उडी त्यानंतर रक्ताची उलटी हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट

देशमुखांच्या छातीवर उडी त्यानंतर रक्ताची उलटी
हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट



बीड : खरा पंचनामा

संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येची कबुली देताना आरोपी सुदर्शन घुलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबातील थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला आहे. घुलेनं जबाबातील म्हटले की वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहे.

मी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे. वाल्मिक कराडनं सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यानेच अपहरण करून हत्या केली. संतोष देशमुख यांच अपहरण करून आम्ही त्यांना दोन तास मारहाण केली. दोन तासांच्या मारहाणीवेळी जयराम चाटच्या फोनवरून माझं विष्णू चाटेशी दोन ते तीन वेळा बोलणं झालं. मारहाणीवेळी प्रतीक घुलेनं पळत येऊन दोन्ही पायांनी देशमुखांच्या छातीवर उडी मारली. त्यानंतर देशमुखांनी रक्ताची उलटी केली. सरपंच निपचित पडल्यावर आम्ही गाडीत टाकलं. जयराम चाटेनं पुन्हा सरपंचाचे काढलेले कपडे घातले. दिवस असल्याने आम्ही सरपंचाचा मृतदेह गाडीत टाकला आणि अंधार पडण्याची वाट पाहिली. अंधार पडताच देशमुखांचा मृतदेह आम्ही दैठण फाट्याजवळ फेकून दिला आणि स्कॉर्पिओ घेऊन वाशीच्या दिशेने पळून गेलो. वाशीत पोलिसांना पाहून आम्ही स्कॉर्पिओ सोडून पळ काढला.

सुदर्शन घुलेच्या मित्राच्या जबाबातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट होता. सुदर्शन घुलेनं विष्णू चाटेला सांगितलं होतं की संतोष देशमुखला उद्धा उचलून नेतो आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो. तिरंगा हॉटेलमधल्या बैठकीत घुले विष्णू चाटेला बलात्काराच्या गुन्ह्यात सरपंचाला अडकवण्यासंदर्भात बोलला होता. यावर विष्णू चाटेने घुलेला सांगितलं, तुला काय करायचं ते कर नाहीतर गावाकडे चितर पाखरं आणि ससे सांभाळ पण केजला येऊ नको. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर केज पोलिसांनी दिरंगाई करत कसा कानाडोळा केला हे ही देशमुखांचा चुलतभाऊ शिवराज देशमुख यांनी जबाबातील सांगितले आहे. बघा काय दिला देशमुख यांनी जबाबातील सांगितले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.