Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मी मुंडे-कराडच्या गाड्या पकडत होतो.. माझ्या खात्यात १० लाख कसे आले?"

"मी मुंडे-कराडच्या गाड्या पकडत होतो.. माझ्या खात्यात १० लाख कसे आले?"



बीड : खरा पंचनामा

बीडमध्ये एकीकडे संतोष देशमुख खून प्रकरण गाजत असताना दुसरीकडे बीडच्या पोलिस दलामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच पीएसआय रणजित कासले यांना एका प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर कासले हे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगवेगळ्या पोलखोल करीत आहेत.

निलंबित पीएसआय कासले यांनी थेट धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ते म्हणतात, विधानसभेची निवडणूक पार पडली तेव्हा मला परळीमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला होता. पेट्या येणार होत्या त्या दिवशी माझी ड्युटी बदलण्यात आली. कारण मी अगोदर वाहतूक शाखेत होतो तेव्हा मी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या गाड्या पकडल्या होत्या. परंतु आमच्या पीआयने त्यावर कारवाई करु दिलेली नव्हती. गाड्या पकडत होतो, अडवत होतो. त्यामुळे मला निवडणूक ड्युटीपासून दूर केलं.

"तुम्हाला ड्युटी नाही, असं मला सांगण्यात आलेलं होतं. मला रिझर्व्ह ठेवण्यात आलेलं होतं. मला वेगळं वाटत होतं. त्याच दिवशी माझ्या अकाऊंटवर १० लाख रुपये आले. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या खात्यातून माझ्या पगाराच्या खात्यात पैसे आले. हे पैसे का आले याचा शोध गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला पाहिजे. त्यानंतर काही लोकांनी माझं लोकेशन काढलं. करमाळा, बार्शीपर्यंत मला घेऊन गेले. मी त्या चार लोकांच्या पाया पडलो आणि माझ्या मित्राला फोन केला, त्याने मला सोडवलं." असं कासले म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.