'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने सर्व राज्यांना मागे टाकले!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
तेलंगणातील दलबदलू आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर बोट ठेवताना, पक्षांतर करत असलेल्या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीकडे न्यायालयाने लक्ष वेधले. 'आया राम, गया राम' मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले, अशा शब्दात 'सर्वोच्च'ने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून सुनावले आहे.
न्यायमूर्ती भूषण आर. गवई आणि न्यायमूर्ती एजी मसिह यांच्या खंडपीठासमोर तेलंगणातील काँग्रेसमध्ये सामील झालेल्या तीन भारत राष्ट्र समिती आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित खटल्याची सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने म्हटले की, राजकीय पक्षांतर रोखण्याचे उद्दिष्ट असलेली संविधानाची 10वी अनुसूची निरर्थक ठरत आहे. कारण पक्षांतर करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.
न्यायमूर्ती मसिह यांचे बंधू पंजाब आणि हरिणाया इथले आहे. तिथला राजकीय संदर्भ देताना, आया राम गया राम तिथं जोरात सुरू आहे. पण अलीकडे महाराष्ट्राने या बाबतीत सर्व राज्यांना मागे टाकले आहे, असे निरीक्षण नोंदवले. 'आया राम, गया राम' थांबवणे हा 10व्या अनुसूचीचा उद्देश असल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयांनी या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला नाही, तर ही 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.