तृतीयपंथी म्हणून रहाणारे ८ बांगलादेशी अटकेत !
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील मुंबईत पहिल्यांदाच पोलिसांनी आठ बांगलादेशी ट्रान्सजेंडरना अटक केली आहे. तसेच धक्कादायक माहिती समोर आली आहे आहे की, हे सर्व बांगलादेशी त्यांची ओळख आणि लिंग बदलून राहत होते. पोलिस शहरातील बांगलादेशी नागरिकांना शोधत होते, परंतु पोलिसांपासून वाचण्यासाठी ते ट्रान्सजेंडर म्हणून राहत होते. पोलिस शहरातील बांगलादेशी नागरिकांना शोधत होते, परंतु पोलिसांपासून वाचण्यासाठी ते ट्रान्सजेंडर म्हणून राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या शिवाजी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व बांगलादेशी त्यांची ओळख आणि लिंग बदलून राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी कलाकार (नर्तक) म्हणून काम करत होते आणि वैध कागदपत्रांशिवाय येथे राहत होते. या आरोपींनी त्यांची नावे, ओळख आणि काही प्रकरणांमध्ये त्यांचे लिंग देखील बदलले होते, ज्यामुळे ते इतर नागरिकांपेक्षा वेगळे दिसत होते. गुप्त माहितीच्या आधारे, शिवाजी नगर पोलिसांनी रफिक नगर परिसरात सापळा रचला आणि आठ ट्रान्सजेंडर बांगलादेशी नागरिकांना अटक केली. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की हे सर्वजण बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.