सुपारीबाज लोकांकडून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाच्या बदनामीचा प्रयत्न
इस्लामपूरमधील विविध पक्ष, संघटनांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
सांगली : खरा पंचनामा
पोलिस निरिक्षक संजय हारुगडे साहेब यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यात सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिस दलाच्या बोध वाक्याचा सुखद अनुभूती इस्लामपूर शहरवासीयांना दिली आहे. काही राजकीय व्यक्ती त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुपारीबाज लोकांकडून निरीक्षक हारूगडे यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांची बदनामी सुरु असून त्यांच्यावर राजकीय दबावाने कोणतीही कारवाई करू नये, असे निवेदन इस्लामपूर शहर परिसरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, विविध संघटनांच्यावतीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, इस्लामपूर येथील पोलीस निरीक्षक संजय हारुगडे हे इस्लामपूर येथील पोलिस ठाणेमध्ये नेमणूक झालेपासुन आजअखेर इस्लामपूर शहरामध्ये तसेच इस्लामपूर पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्रात येणा-या सर्व गावामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारची कामगीरी केली आहे. त्यांनी त्यांच्या परीने गोर गरीब जनतेला व सर्व सामान्य नाकरीकांना न्याय देण्याची भूमिका बजावली आहे. तसेच इस्लामपूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रामधील गुंडगिरी व अवैद्य धंदेवाल्यांच्यावरती चांगल्या प्रकारे वचक बसविली आहे. त्यामुळे सदरच्या अधिका-यावरती राजकीय दबाव टाकून त्यांच्या विरूध्द मोर्चे आंदोलने करून त्यांना दबावामध्ये ठेवून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे इस्लामपूर शहर व परिसरामध्ये अशांतता निर्माण झाली आहे व नागरीकांच्यामध्ये संतापाची लाट उसळून आलेचे दिसून येत आहे.
तरी विद्यमान पोलिस निरिक्षक यांची कामाची कर्तव्य निष्ठा पाहून आपण वरिष्ठ अधिकारी या नात्याने त्यांना चांगल्या कामाबद्दल प्रोत्साहन दयावे व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्व सामान्य जनतेला न्याय दयावा व इस्लामपूर शहरवासीयांना भयमुक्त करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), दलित महासंघ, शिवशेभो प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, बहुजन समाजपार्टी, संत रोहिदास चर्मकार महासंघ आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.