दिशा सालियनवर बलात्कार नाहीच; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
मुंबई : खरा पंचनामा
अभिनेता सुशांत सिहं राजपूतची माजी मॅनेंजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने पाच वर्षानंतर पुन्हा खळबळ उडवून दिलीय. दिशा सालियनचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला नसून तिच्यावर सामुहीक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता.
तर यावरून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर अधिवेशनात देखील यावरून गोंधळ झाला होता. आता याप्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून दिशावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे.
पाच वर्षांपूर्वी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. यावरून आता गोंधळ सुरू झाला आहे. तर तिच्या चेहऱ्यावर, अंगावर किंवा डोक्यावर कोणत्याच गंभीर इजा दिसत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
तर तिचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप सतीश सालियनच्या वकीलांनी केला होता. यावरून त्यांनी आदित्य ठाकरेंसह इतरांची चौकशी केली जावी, त्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती.
पण आता दिशा सालियनचा पाच वर्षांपूर्वीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालात दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा असून शरीरावर गंभीर जखमा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं असा खुलासा यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे दिशावर बलात्कार झाला असे आता म्हणता येणार नाही.
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा होत्या अशी नोंद आहे. पण दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. त्याच गंभीर जखमेमुळे तिचा मृत्यू झाल्याचं या अहवालातून सांगण्यात आले आहे. दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह काही इतरांवर नव्याने काही आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेत दिशा सामुदायिक बलात्कार झाल्याचे म्हटलं आहे. तर तिची हत्या करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी दिशाचा पोस्टमॉर्टम राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोपही केला आहे.
मात्र समोर आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालातील नोंदीनुसार दिशावर कोणताही बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आलेले नाही. यामुळे आता तिच्या वडिलांनी जो आरोप केला होता त्याचा पुरावा मिळत नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.