अनैतिक संबंधातून पोलीस कर्मचाऱ्याला गळा आवळून संपवलं
मृतदेह बंद गाडीत आढळला
बुलढाणा : खरा पंचनामा
देऊळराजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. गळा आवळून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. दरम्यान अनैतिक संबंधातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना रविवारी समोर आली होती. या प्रकरणातील मृत पोलीस कर्मचाऱ्याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची कबुली मुख्य आरोपीने पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे.
अधिक माहितीनुसार, गावातीलच बाबासाहेब मस्के यांनी जालना जिल्ह्यातील टायगर नामक इसमाला सुपारी दिली होती. त्यावरून टायगर याच्या दोन साधीदारांनी मिळून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मस्के यांना एका बारमध्ये दारू पाजली. त्यानंतर बाहेर आणून त्याचा गळा आवळून हत्या केली. यानंतर पोलिसाचा मृतदेह गाडीमध्येच टाकून दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी तपास चक्र जोरात फिरवत खुनाच्या घटनेतील मुख्य आरोपी बाबासाहेब मस्के यांच्यासह खुनात सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली आहे. दरम्यान यामध्ये अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.