Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चक्क पुरुष झाला प्रेग्नंट! रिपोर्ट पाहून घाम फुटला, डॉक्टर म्हणाले 'तुमच्या पोटात....'

चक्क पुरुष झाला प्रेग्नंट! 
रिपोर्ट पाहून घाम फुटला, डॉक्टर म्हणाले 'तुमच्या पोटात....'

पटणा : खरा पंचनामा

आपण प्रेग्नंट असल्याचा रिपोर्ट पाहून पुरुषाला घाम फुटला, यानंतर तो धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. यानंतर डॉक्टरांनी जेव्हा पुरुषाचा सिटी स्कॅनचा रिपोर्ट बघितला तेव्हा त्यांनाही धक्का बसला, कारण रिपोर्टमध्ये पुरुषाच्या पोटात महिलेप्रमाणे गर्भाशय दिसला. हा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण एसकेएमसीएच मधल्या सिटी स्कॅन सेंटरमधील आहे.

पुरुष प्रेग्नंट असल्याचा हा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता महिलांना त्रास सहन करावा लागणार नाही, अशा वेगवेगळ्या कमेंट युजर्स करत आहेत. पण अखेर हे प्रकरण वेगळंच निघालं. पुरुषाच्या पोटामध्ये बाळ नव्हतं, तर सिटी स्कॅन सेंटरने केलेली ही घोडचूक होती, ज्यामुळे पीडित व्यक्तीचं टेन्शन वाढलं होतं.

सिटी स्कॅनचा हा रिपोर्ट पाहून पुरुष घाबरला होता, कारण त्याच्या पोटात बाळ असल्याचं रिपोर्टमध्ये लिहिलं गेलं होतं. तसंर रिपोर्टमध्ये महिलेच्या शरिरात असलेलं युट्रस आणि ओवरी याचाही उल्लेख केला गेला होता. हा रिपोर्ट पाहून पुरुषाला घाम फुटला, यानंतर त्याने सखोल चौकशी केली. तेव्हा सिटी स्कॅन सेंटरने महिलेच्या रिपोर्टवर पुरुषाचं नाव लावलं होतं. रिपोर्टमधील नाव बदलल्यामुळे पुरुषाच्या पोटात बाळ असल्याचं रिपोर्टमध्ये लिहिलं गेलं होतं.

बिहारच्या मुजफ्फरपूरमधल्या सिटी स्कॅन सेंटरमधून हा प्रकार समोर आला आहे. मुजफ्फरपूरमधील वैद्यकीय क्षेत्र याआधीही वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आलं होतं. रुग्णालयात पाय तुटलेल्या रुग्णाला प्लास्टर बांधण्याऐवजी कार्टन बांधलं गेलं होतं, आता सिटी स्कॅनमध्ये पुरुषाला महिलेचा रिपोर्ट लावून प्रेग्नंट असल्याचं सांगितलं गेलं.

मिळालेल्या माहितीनुसार शशी रंजन सिटी स्कॅन सेंटरमध्ये तपासणीसाठी गेले होते. तेव्हा सिटी स्कॅन सेंटरने शशी रंजन यांना महिलेचा रिपोर्ट दिला. रिपोर्टमध्ये नाव बदललं गेल्यामुळे पुरुषाच्या पोटात बाळ असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. हा रिपोर्ट घेऊन शशी रंजन घरी पोहोचले आणि त्यांनी हा रिपोर्ट घरच्यांना दाखवला तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली, पण जेव्हा सत्य समजलं तेव्हा त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.