महाराष्ट्रीयन तरुणीची बंगळुरूत हत्या
सुटकेसमध्ये आढळले मृतदेहाचे तुकडे, पतीला पुण्यातून अटक
बंगलोर : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील एका विवाहित तरुणीची बंगळुरूमध्ये निघून हत्या करण्यात आली आहे. ही तरुणी बंगळुरूमध्ये नोकरी शोधत होती. बेंगळुरूमध्ये तिची पतीने हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि सूटकेसमध्ये ठेवले, त्यानंतर स्वतः सासरच्या लोकांना बोलावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार अगदी तसाच आहे जसे मेरठच्या सौरभ खून प्रकरणात घडला होता. आता बेंगळुरूमधून एक भयानक खून प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्रीयन तरुणीसोबत हा प्रकार घडला. मेरठ येथील मुस्कानने पती सौरभची हत्या करून शरीराचे अवयव सिमेंटच्या ड्रममध्ये टाकले होते, तर बेंगळुरूमध्ये पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि तिच्या शरीराचे अवयव सुटकेसमध्ये भरून पळ काढला.
तरुणीच्या खुनाची घटना बंगळुरूच्या हुलीमावू भागात घडली. येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या राकेशने त्याची 32 वर्षीय पत्नी गौरी अनिल सांबेकर यांची निघृण हत्या केली. राकेश हा महाराष्ट्राचा रहिवासी असून तो त्याच्या पत्नीसोबत बंगळुरूमधील दोड्डुकन्नहल्ली येथे राहत होता. गौरी आणि तिचा पती राकेश हे फेब्रुवारी 2025 मध्ये हुलीमावू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दोड्डाकम्मनहल्ली येथे तिसऱ्या मजल्यावर भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले होते. राकेश बेंगळुरूमध्ये काम करत होता. एका खाजगी कंपनीत काम करणारा राकेश घरूनच काम करत असल्यामुळे तो बहुतांश वेळ घरीच असायचा.
राकेशची पत्नी गौरी मास कम्युनिकेशनमध्ये पदवीधर झाली असून ती नोकरी करत नव्हती. गौरीचा मृतदेह बाथरूममध्ये सुटकेसमध्ये सापडला. घरमालकाने गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता हुलीमावू पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तेथे पोहोचून घराची झडती घेतली. पोलिसांना बाथरूममध्ये एक तेथे पोहोचून घराची झडती घेतली. पोलिसांना बाथरूममध्ये एक सुटकेस सापडली. पोलिसांनी सुटकेस उघडली तेव्हा त्यांना गौरीचा चिरलेला मृतदेह दिसला.
शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, पती-पत्नी दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. सूत्रांच्या माहितीनुसार, गौरीने रागाच्या भरात पती राकेशवर अनेकदा हातही उचलला होता. राकेश रागाने त्रस्त होता आणि पत्नी गौरी हिला कंटाळला होता. रागाच्या भरात राकेशने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश आणि गौरी यांच्यात एके दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यांच्यातील हाणामारी इतकी वाढली की, रागाच्या भरात राकेशने पत्नी गौरीच्या पोटात वार केले आणि तिच्या शरीरावर जखमा झाल्या. गळा चिरून खून केला. यानंतर राकेशने पत्नीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले, ते एका मोठ्या सुटकेसमध्ये भरले आणि बाथरूममध्ये टाकून पळ काढला.
राकेशने पत्नीच्या आई-वडिलांना फोन करून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पत्नीची हत्या करून राकेश पुण्याला पळून गेला होता. पुणे पोलिसांनी राकेशला अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.