Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कांचनताईंच्या निधनामुळे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

कांचनताईंच्या निधनामुळे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी 
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परुळेकर यांचे निधन . त्या ७४ वर्षांच्या होत्या. गेली काही वर्ष त्याकर्करोगाने आजारी होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कांचनताई परुळेकर यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले. 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, गेली अनेक वर्षे महाराष्ट्रभर झंझावाती दौरे करून कांचनताई परुळेकर यांनी महिलांना उद्यमशीलतेची प्रेरणा दिली. डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन आणि स्वयंप्रेरिता औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. त्यांच्या निधनामुळे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी लढणाऱ्या एका झुंजार व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. कांचनताईंच्या निधनामुळे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कांचनताई परुळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे पाटील यांनी म्हटले. 

अध्यापन काळातच त्यांनी विद्यार्थिनींसाठी ‘कमवा शिकावा’ योजनेचा पाया तयार केला. गरीब विद्यार्थिनींना आर्थिक मदत दिली जायची. नुसते पैसे वाटण्यापेक्षा त्यांना जर श्रमाचे पैसे दिले तर ते घेताना त्यांचा स्वाभिमान जागृत होईल, असे त्यांचे म्हणणे होते. श्रमाला प्रतिष्टा मिळेल. कष्टाची सवय लागेल. या प्रमाणे त्यांनी १६ रु मजुरीवर २ वर्ग रंगवून घेतले. हेच काम त्यांनी १९९२ साली संस्थेच्या स्वरूपात सुरू करून संस्थेला ‘स्वयंसिद्धा’ नाव दिले. स्वयंसिद्धा’ संस्थेच्या कार्याची दखल घेऊन ‘सारडा समान संधी’ हा साडेसात लाख रुपयांचा पुरस्कार कांचनताई परुळेकर यांना मिळाला.स्त्रियांसाठी ‘स्वयंसिद्धा’ हे माहेरघर बनले. नाममात्र मूल्य घेऊन ३० प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. संगणक हाताळणी, विविध हस्तकला, पस्रेस, पाककलेपर्यंतच्या अनेक व्यवसायांचा यात समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.