Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो !

मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो !



मुंबई : खरा पंचनामा

गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेच्या एका बॅनरने सर्वाचेचं लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकला आहे. बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकार ठाकरेंसहीत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो या बॅनरवर आहे. मनसेच्या बॅनरवर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी, "माझा फोटो वापरायचा नाही", असे सांगितल्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

दरम्यान, मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी या बॅनरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. "ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्याभरात त्याने हे बॅनर्स लावले. बॅनर्स काढण्यात येतील," असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे. तसेच, "सध्या या बॅनर्सची फक्त मिडिया मध्ये चर्चा सुरू आहे. "ज्या तरुण कार्यकर्त्याने ही बॅनर लावले त्याच्याशी मी बोललो. संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांनी देखील त्याच्याशी संवाद साधला आहे. हे बॅनर काढले जातील," असं किल्लेदार यांनी स्पष्ट केलं आहे. मुनाफ ठाकूर नावाच्या कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.