अंग काळं-नीळं पडेपर्यंत महिला वकिलाला 10 जणांकडून अमानुष मारहाण
बीड : खरा पंचनामा
बीडच्या आंबेजोगाईमधून एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. सनगाव येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेला शेतामध्ये मारहाण केल्याची भयंकर घटना घडली आहे. सदर महिलेचे फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
या सगळ्यामध्ये सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. सदरप्रकरणी पीडित महिलेने गावातील सरपंच आणि इतर व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान असे मारहाण झालेल्या पीडितेचं नाव असून त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात.
महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. याबाबत तक्रारी दिल्याच्या रागातून ही मारहाण झाली आहे. दहा ते बारा जणांच्या टोळीने रिंगण करून अमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित महिला वकील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचं संपूर्ण अंग काळंनिळं झालं आहे. याबाबतचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण गावचे सरपंच आणि त्यांच्या साथीदारांकडून करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेनं केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील ध्वनिप्रदूषणाची तक्रार का केली? म्हणून अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. पीडितेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.