मिरजेतील मजुराच्या खुनाचा 24 तासात छडा
संशयिताला मुंबईतून अटक : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील कोल्हापूर चाळ येथे झालेल्या मजुराच्या खुनाचा 24 तासात छडा लावण्यात यश आले आहे. किरकोळ वादातून खून करणाऱ्या संशयिताला मुंबई येथून अटक करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
स्वप्निल बाळासाहेब कांबळे (वय 27, रा. कोल्हापूर चाळ, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शनिवारी रात्री मजूर प्रकाश लक्काप्पा कांबळे याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. प्रकाश कांबळे आणि स्वप्निल कांबळे हे दोघे मित्र आहेत. दोघेही कोल्हापूर चाळ येथे रेल्वे मार्गालगत असणाऱ्या वडाच्या झाडाखाली शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गेले होते. यावेळी दोघांच्या शिवीगाळ करण्यावरून वाद झाला. या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी नशेत असणाऱ्या स्वप्निल कांबळे याने प्रकाश कांबळे याच्या डोक्यात दगड घालून त्यांचे डोके दगडाने ठेचले होते. अति रक्तस्त्रावामुळे प्रकाश कांबळे याचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, या खुनाच्या घटनेनंतर संशयित स्वप्निल कांबळे हा रेल्वेने मुंबईकडे गेला होता. परंतु स्वप्निल कांबळे याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्याचा नेमका ठाव ठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता. परंतु गोपनीय माहितीच्या आधारे स्वप्निल कांबळे हा मुंबईत असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक शनिवारी रात्रीच मुंबईकडे रवाना झाले होते. त्यानंतर रविवारी सकाळी स्वप्निल कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. वारंवार होत असलेले शिवीगाळ आणि किरकोळकारणातून हा खून केला असल्याचे स्वप्निल कांबळे त्याने पोलिसांना कबुली दिली आहे. परंतु या प्रकरणात स्वप्निल कांबळे हा एकटाच होता की त्याच्यासोबत अन्य साथीदार होते. याबाबतचा तपास देखील सहायक निरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, विनोद शिंदे, रुपाली गायकवाड, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, सतिशकुमार पाटील, अभिजीत धनगर, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सूरज पाटील, संतोष डामसे, सर्जेराव पवार, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, महेश गुरव, राजेद्र हारगे, महेश मासाळ, सुनिल माने, विजय शिंदे, अजितसिंह कोळेकर, सुनिल कांबळे, देवानंद नागरगोजे, कैप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.